रघुवीर कुल लिखित कुल व्यक्तिचित्र - मुसाफीर
काही माणसांबरोबर आपली काही असोसिएशन्स असतात. माझ्या बाबतीत वैद्य म्हणजे रेल्वे प्रवास आणि माझा अगदी ठरलेला प्रवास म्हणजे दरवर्षीचा फिल्म फेस्टिव्हलचा. कधी दिल्ली तर कधी मद्रास तर कधी हैद्राबाद , कलकत्ता या महोत्सवात मी वैद्यांना असेच ग्रे कोटामध्ये, हातामध्ये बुलेटिन घेऊन, गळ्यात डेलिगेट कार्ड मंगळसूत्रासारखे मिरवत फिरताना पाहिलं होतं. पण ते नक्की कधी ओळ...