रघुवीर कुलकर्णी लिखित व्यक्तिचित्र - दोघीच
अंजू ठाकूर नाना -नानी पार्कमध्ये चालत होती. ट्रॅकसूटमधून तिच्या थंडर थाईज आणि विशेष दंडाधिकारी या पदवीला शोभतील असे जाडे थलथलीत दंड, पोटाचा आणि पार्श्वभागाचा गरगरीतपणा ही आयुष्यभर चालली तरी कमी होणार नाहीत असे वाटत असे. पण निसर्गदत्त महाराज म्हणतात तेच खऱे. अपेक्षित नाही पण अनपेक्षित नक्कीच घडेल हे अंजूच्याा आयुष्याच्या बाबतीत शंभर टक्के खऱे होते. कोलकत्...