रघुवीर कुल लिखित कुल व्यक्तिचित्रे - देबू देवधर
खरं तर देबू पक्का पुणेकर! फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना पुण्यात घर असूनही होस्टेलमध्ये राहणारा शंकर होस्टेलमधील मित्रांनी त्याचे नाव ठेवले देबू ! तिथे त्याचे शंकर नाव कुठे गेले ते कळलेच नाही. पुढे तो देबू देवधरच नाव लावू लागला. छायाप्रकाशाचा खेळ खेळणा-या देबूचा कॅमे-यावरचा त्याचा हात अत्यंत स्थिर होता. किर्लोस्करांवरच्या डॉक्युमेंटरीची निर्मित...