रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : भटक्या विमुक्त विलास
१९७२ ते १९८५ पर्यंतचा दूरदर्शनचा काळ बहारीचा होता. महाराष्ट्राचं दूरदर्शन म्हणजे सांस्कृतिक अड्डा होता. नाटककार, कलावंत, कवि, चित्रकार, लोककलेतील मोहरे, सा-यांची हजेरी दूरदर्शनच्या हिरवळीवर होत असे. अशा वातावरणात विलास दूरदर्शनवर स्वतःहून लागला. कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही हा त्याचा खाक्या होता. कॅमेरा एडिटिंगच्याा तंत्रावर विलास सहजपणे...