रघुवीर कुलकर्णी लिखित व्यक्तिचित्र - बाबुराव कामत. शिवाजी पार्कची गर्दी. त्या गर्दीच्या माना वर. आकाशामध्ये गॅसच्या फुग्यांच्या झुपक्याला एक थर्माकोलची पाटी लटकलेली. त्यावर लिहिलेलं. बाबूराव कामत ॲन्ड फिल्स, इस्टेट एजंटस, घर, फ्लॅट, बंगला, ऑफिस, गॅरेज, प्लॉट यासाठी भेटा, पिंपळाच्या झाडाखााली. वेळ संध्या साडेसहा ते नऊ. या मजकुरातला विरोधाभास ढळढळीत होता. स्वतः इस्टेट एजंटचे काम करणारा बाबूराव कामत ...