रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : अय्या गोडबोले
अय्या गोडबोलेची आठवण येण्याचे कारण म्हणजे आताच बीबीसीवर ऐकले की थायलंडमध्ये शाळांमध्ये तृतियपंथींसाठी वेगळी स्वच्छतागृहे ठेवली जातात. अय्या हा कॉलेजमध्ये नेमका आमच्या वर्गात आला. अय्याला अनेक नावे पडली होती गुलाब, छगन, मिठ्ठा, पावली, पानी कम अशी कितीतरी. अय्याचा बाप मिलिटरीत होता. एकदम रांगडा माणूस. बंदूकीच्या गोळीवर आापले नाव नसले तर बॉंब वर्षावातही ...