रघुवीर कुलकर्णी लिखित व्यक्तिचित्र : अब्दुल
भायखळा ब्रीजवरून फिरायला जाताना मला नेहमी अब्दूल भेटत असे. अब्दुल आमचा हजाम. वीस- बावीस वर्षांपर्यत तोच आमचे केस भादरायचा. अब्दुल बरोबर नऊ वाजता घरी हजर होत असे. त्याच्या पेटीत विविध प्रकारची केस कापायची हत्यारे होती. केस कापत असताना तो तुलसीरामाचे रामायणाचे दोहे गात असे. उत्तर प्रदेशातील गावाकडे रामलीलेशिवाय त्याने काही ऐकले नव्हते.
अचानक एकदा तो दोन त...