जुलै २०२१ मध्ये चीनच्या कम्युनिस्ट क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने चीनी क्रांतीचा प्रवास समजून घेणं महत्वाचं आहे.
माओच्या चरित्राच्या अंगाने माओपूर्व चीन आणि माओने घडवलेल्या कम्युनिस्ट क्रांतीनंतरचा चीन यांचं चित्रण वि. ग. कानिटकर 'क्रांतीचे चित्र आणि चरित्र - माओ' या पुस्तकातून करतात. रशियात लेनिनने केलेल्या मार्क्सवादी क्रांतीतून प्रेरणा घेऊन माओने चीनमध्ये क्रांती केली. माओच्या ह...