जगात चित्रविचित्र अपघात आणि भीषण घटना नेहमीच घडत असतात. त्यातल्या काही खरोखर अंगावर काटा आणणाऱ्या असतात. महायुद्धाच्या काळात तर त्यांचे प्रमाण खूपच दिसून येते. काही वेळा निव्वळ गैरसमजुतीने निरपराध लोकांना शत्रू समजून त्यांचा छळ केला जातो. अनन्वित अत्याचार होतात. सैनिकांना दिवसेंदिवस उपासमार सहन करावी लागते. प्रसंगी, ते एकमेकांच्या जिवावर उठायलाही मागेपुढे पाहत नाहीत. कसं ते ऐकुया या कथेतून.