मुंबईतला एक तरुण - बाळ्या, पुण्यात त्याच्या मित्राकडे अभ्यासाला जातो. सीएच्या परिक्षेत तीनदा नापास झालेल्या आणि पुन्हा जोमानं अभ्यास करून पास होण्याची आशा बाळगलेल्या बाळ्याला, हवी ती शांतता मिळते का? कसला कोलाहल, गजबजाट आहे त्याच्या भोवती? ही फक्त त्याचीच कहाणी आहे की आपल्या सगळ्यांची? अखंड गजबजाटात अडकलेल्या बाळ्याच्या माध्यमातून तेंडुलकरांना काय सुचवायचं आहे? मानवी जीवनातल्या विसंगती नेमकेपणानं ...