नेहेमिया नीळकंठशास्त्री गोरे ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा 'होरपळ' या कादंबरीचा गाभा आहे. नीळकंठशास्त्री गोरे हा ख्रिस्ती झालेला भारतातला पहिला विद्वान कर्मठ. परंतु ही कादंबरी चरित्रात्मक नाही. त्यात गोरेंसंदर्भात उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक दस्तांचा आधार जरूर घेतलेला आहे, तरीही अनेक काल्पनिक पात्रे नि प्रसंग गुंफले आहेत. ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर आधारित वास्तव आणि कल्पनेची बेमालूम मिश्रण केलेली वि.ग. कानिटकर...