जगातले कोणतेही दु:ख, कोणतीही समस्या पहिली नसते किंवा अखेरची. प्रत्येक पुढच्याला ठेच लागलेली असते, पण मागचे कोणीच शहाणे होत नाहीत. या अर्थाने होणारी इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजेच 'गोष्ट जन्मांतरीची'.
जन्मजन्मांतरी केवळ घटनाच परत परत तशाच घडतात; असे नाही तर माणसेही पुन:पुन्हा तसाच विचार करतात, तसेच शब्द बोलतात आणि त्याच त्या कृती करत राहतात. या भोवर्यात पकडूनच नियती प्रत्येक माणसाला त्याच्या गतीकडे...