डॉ. रॉबर्ट कॉख हे १८६२ मध्ये जर्मनीतील गॉटींजेन महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होते. तेथे त्यांच्यावर हेन्ले या प्राध्यापकाचा प्रभाव पडला. हेन्ले यांनी १८४० मध्ये परोपजीवी जंतूंमुळे रोग होतात, असे एका प्रबंधात मांडलं होतं. वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेत असताना संसर्गजन्य रोग या विषयाबद्दल रॉबर्ट कॉख यांना विशेष आवड निर्माण झाली.
१८६० मध्ये वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी वैद्यकीय अ...