चालू वर्ष हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचविसाव्या जयंतीचं आहे. डॉ. आंबेडकरांनी दलित समाजाला मोकळा श्वास घेण्याची संधी दिली, नवं आकाश दाखवलं. त्या समाजाचा आवाज बुलंद केला. प्रत्येकानं शिक्षण घेतलंच पाहिजे असा आग्रह धरला. त्यातूनच कर्तबगारीची नवनवी शिखरं दलित बांधवांनी काबीज केली. त्यातले अनेक जण उद्योजक झाले. त्या उद्योजकांचा संघटित आवाज म्हणजेच दलित इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंड...