बांगलादेशी घुसखोरी ही केवळ अर्थिक कारणासाठीच होत आहे असे नाही तर काही बांगलादेशी हे देशद्रोही दहशतवाद्यांना मदत करणे अशी कामे करीत आहेत. यात खोट्या नोटांचा प्रसार, अफू, गांजा-चरस अशा अमली पदार्थांची तस्करी तसेच चोर्या, दरोडेखोरी अशा कामातही ते गुंतल्याचे दिसते. पश्चिम बंगालमध्ये 29% व आसाममध्ये 34.7% लोकसंख्या बांगलादेशी आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येबाबत त्याच क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी...