नाईक, आदिदास, रिबॉक, प्युमा असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडस खेळाडुंना लागणारे विशिष्ट डिजाईनचे शूज आणि कपडे बनवतात. प्रत्येक खेळाच्या वैशिष्टयानुसार ते डिजाईन केलेले असतात. तरूण वर्गात हे ब्रँडस लोकप्रियही आहेत . पण सायकलिंग, ट्रायथॉलन आणि रनिंग या खेळांसाठी कुणीच काही बनवत नाही हे आदित्य केळकर या उद्योजकाच्या लक्षात आलं आणि आपली अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात येऊन त्याचे ॲपेस हा ब्रँड बनवला. ॲपेस या...