कोन्सांतिन एड्यॲड्रोविच झिओल्कोविस्की हा व्यवसायाने शाळामास्तरच होता पण तो हौशी शास्त्रज्ञ पण होता. अग्निबाणांचा अवकाशप्रवासासाठी उपयोग करता येईल ही कल्पना सर्वप्रथम त्याच्या डोक्यात आली. इ.स.१८८३मध्ये बाहेर फेकल्या जाणा-या कणांची प्रतिक्रिया म्हणून अग्निबाणाला विरूध्द दिशेने गती मिळते हा विचार कोन्त्सातिनला सुचला. त्याबाबत पुढची सतरा वर्षे तो विचार करत होता त्यातुनच अग्निबाणाच्या गतीचे गणित तयार ...