क्रीडाप्रकार कोणताही असो, त्यासाठी विशिष्ट प्रकारचे शूज घालणं हे अलीकडे रुढ झालंय. सकाळचा फेरफटका मारणं असो अथवा मैदानावर जाऊन खेळणं असो, स्पोर्ट्स शूज घालणं हा अलिखित नियम झालाय. त्यामुळेच त्यात भरपूर ब्रॅंड्स आलेले आहेत. आदिदास हा या सगळ्यात आलेला सुरुवातीचा ब्रँड. त्याचीच ही जन्मकथा.